महागाईने गाठला कळस! आता गॅस सिलिंडरच्या किमतीतही झाली मोठी वाढ

144

महागाईने आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तर आधीच वाढल्या आहेत. आता त्यात गॅस सिलेंडरचीही भर पडली आहे. सिलिंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मागच्या वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

म्हणून वाढल्या सिलिंडरच्या किंमती

मंगळवार सकाळपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. युक्रेन-रशिया मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इंधनाच्या दरात खूप मोठी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता सिलिंडरच्या किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. हे दर मंगळवारपासून लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली आहे. यामुळे सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत.

( हेही वाचा:  “… हा केवळ चर्चेचा विषय नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न” )

बिघडले किचन बजेट

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांचे आता गॅस आणि इंधन दरवाढीने किचन बजेट बिघडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.