केवळ मराठीतून शिक्षण घेतले म्हणून सरकारने शिक्षकांची उपेक्षा केली आहे. मराठीतून शिक्षण घेतलेल्या 150 शिक्षकांची मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये अडवणूक करण्यात आली. याविरोधात 130 दिवस आंदोलन करुनही या 150 शिक्षकांना न्याय मिळालेला नाही. पालिका शिक्षण विभाग आणि शासन या शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच करत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे.
म्हणून नियुक्ती केली नाही
पालिका सहशिक्षण आयुक्तांनी या उमेदवारांना भेट दिली आणि सरकराकडून पुढील कार्यवाहीच्या सूचना आल्याशिवाय काही करु शकत नसल्याचे सांगण्यात आले. आता सुरु असलेल्या अधिवेशनात मराठीतून शिक्षण घेतलेल्या या शिक्षकांच्या उपेक्षेबाबत प्रश्न करण्यात आला होता. याच्या उत्तरादाखल मुंबई पालिकेचे शिक्षण विभागाचे माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे ऑनलाईन शिक्षक भरती प्रक्रियेत नियुक्ती मिळालेल्या 150 उमेदवारांनी इंग्रजीतून शिक्षणाची आर्हता पूर्ण केली नसल्याने त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही.
( हेही वाचा: महागाईने गाठला कळस! आता गॅस सिलिंडरच्या किमतीतही झाली मोठी वाढ )
कोणताही ठोस निर्णय नाही
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी चर्चेसाठी ग्रंथालय कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाला बोलवले होते. मात्र, केवळ 60 टक्के अनुदान वाढीशिवाय इतर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रथांलय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी दिली.
Join Our WhatsApp Community