काय सांगताय… आता बारावीत चांगले मार्क्स नसले तरीही प्रवेश मिळवणार!

156

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण असणं हे आवश्यक होते, परंतु आता विद्यार्थ्यांना कमी गुण असले तरी विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याचे कोणतेही कारण नाही. कारण आता प्रवेश परीक्षेच्या आधारावरच महाविद्यालयात प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, परंतु आता नवी प्रणाली लागू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे.

१३ भाषेत होणार ही परीक्षा 

यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CUET) जाहीर केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही परीक्षा १३ भाषांमध्ये होणार आहे. ही परीक्षा हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी भाषेत घेतली जाणार आहे.

(हेही वाचा – “ज्यांचा आदर्शच दाऊद आहे, त्यांना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”)

ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणार

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि जामियासह सर्व केंद्रीय विद्यापीठांना पुढील शैक्षणिक वर्षापासून CUET च्या आधारावर प्रवेश घ्यावा लागेल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. राज्य किंवा खाजगी डीम्ड विद्यापीठे देखील या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात. मोठ्या संख्येने केंद्रीय विद्यापीठांनी CUET 2022 मध्ये त्यांचा सहभाग नोंदविला आहे. त्याची माहिती लवकरच nta.ac.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.