पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातील पहिली फॉरेस्ट ‘कॅनोपी’ ट्रेन!

140

पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्याची जगभरात नोंद घेतली जाते. याच विविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाचे सौंदर्य जवळून न्याहाळण्यासाठी कॅनोपी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. देशातील पहिल्या फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ चोर्ला वाईल्डर नेस्ट नेचर रिसॉर्ट येथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आला. पहा या अनोख्या स्लोप ट्रेनचा व्हिडिओ!

( हेही वाचा : चावीशिवाय सुरू होणार इलेक्ट्रिक स्कूटर! )

पश्चिम घाटाचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची संधी

स्वप्नगंधा रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन नितीन धोंड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. असेच प्रकल्प विविध ठिकाणी उभारले गेले तर पर्यटकांना जैवविविधतेला कोणताही धक्का न लावता निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळणार आहे असे धोंड यांनी सांगितले. या रिसॉर्ट व्यवस्थापनाने इको फ्रेंडली पर्यटनाला चालना दिली आहे असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.

New Project 3 7

भारतात तयार झालेली पहिली स्लोप ट्रेन

कॅनोपी ही भारतात तयार झालेली पहिली स्लोप ट्रेन आहे. या स्लोप ट्रेनमधून साधारणपणे ११० मीटर अंतरापर्यंत जंगलाचे सौंदर्य चारही बाजूने, ३६० डिग्री व्ह्यू पाहता येणार आहे. या ट्रेनमधून वज्र सकल धबधबा, महादायी अभयारण्याचे तसेच पणजी शहर व अरबी समुद्राचेही दर्शन घडणार आहे.

पहा व्हिडिओ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.