रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या चार दिवसांत चिकनच्या किमतीत अचानक ६० रुपयांची वाढ झाली. २४० वरून ३०० रुपये प्रति किलो दर झाला आहे. याबाबत व्यापाऱ्यांना विचारले असता आवक कमी, कुक्कट खाद्य, ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे चिकनचे दर वाढल्याचे त्यांनी सांगितले.
दर वाढले पण विक्रीवर परिणाम नाही
अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे मांसाहारी खवय्यांच्या खिशाला चटका बसत आहे. चिकनचे दर वाढल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक सुध्दा खाद्य पदार्थांचे दर वाढवतील. सोलापुरात शाकाहरीप्रमाणे मांसाहरी खवय्यांची संख्या कमी नाही. स्वादिष्ट जेवण देणा-या प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असते. त्यावरून हॉटेल व्यवसायाचा अंदाज येतो. चिकनपासून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवले जातात. चिकनचे दर अचानक वाढल्यामुळे खवय्यांची चिंता वाढली आहे. दर वाढले तरी विक्रीवर काहीच परिणाम झाला नाही.
( हेही वाचा :अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण होणार! )
पावसाळ्यात दर कमी होणार का?
दरवर्षी उन्हाळ्यात आवक कमी असल्यामुळे, याचे दर थोड्या फार प्रमाणात वाढतात आणि नंतर पावसाळ्यात कमी होतात. यंदा साठ रुपयांनी वाढलेले दर पावसाळ्यात कमी होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community