मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यात बससेवा! पहा वेळापत्रक

146

पुणे मेट्रोला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच या मेट्रो स्थानकांवर पोहोचण्यासाठी पीएमपीकडून विशेष बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पीएमपीकडून पुणे महापालिका क्षेत्रात दोन तर पिंपरी-चिंचवड क्षेत्रात चार स्थानकांवर ही फिडर बससेवा सुरु करण्यात आली आहे. पुणे महामेट्रो व पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते फिडर बससेवेचा शुभारंभ झाला. या फिडर बससेवेचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

( हेही वाचा : पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातील पहिली फॉरेस्ट ‘कॅनोपी’ ट्रेन! )

वाहतूक कोंडी टाळण्यास मदत

गरवारे मेट्रो स्टेशन येथून या फिडर बस सेवेचा शुभारंभ पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पीएमपीकडून सुरु करण्यात येत असलेल्या या फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. तसेच या सेवेसाठी मिडी बसेस संचलनात असतील त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास देखील मदत होणार आहे. प्रवाशांना पीएमपी व मेट्रोची तिकीटे एकाच ॲपमधून मिळावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच या तिकीटाचा दर निश्चित होणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

असे आहे वेळापत्रक

New Project 25

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.