राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करणे आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला झुकवू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. जेथे भाजपचे सरकार नाही तिथे अशा कारवाया होत आहेत, एखाद्या राज्यात निवडणूक हरलो म्हणून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे, ही तर हुकूमशाहीची राक्षसी सुरुवात, नांदी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही
मोदींचे सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांनी २५०० कारवाया केल्या आहेत, त्यातील अनेक कारवाया चुकीच्या पध्द्तीने केलेल्या आहेत. या तपास यंत्रणा हुकूमशहासारख्या वागत आहेत. पाटणकर हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.
प बंगाल, तामिळनाडू, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांतच ईडी सक्रिय आहे, बाकी राज्यात ईडीची कार्यालये बंद केली आहेत. मात्र तरीही ना बंगाल झुकणार ना महाराष्ट्र. जर तुम्हाला वाटत असेल कि महाराष्ट्र सरकार कोसळेल आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल तर तसे काही होणार नाही, मला नाही वाटत कि या परिस्थिती आम्ही न्यायालयात न्याय मिळवू शकू पण जनतेचे न्यायालय श्रेष्ठ आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त)
आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार
या परिस्थितीत न्यायालयावर विश्वास नाही, तुम्हाला जर आम्हा सर्वांना तुरुंगात पाठवायचे असेल, तर आम्ही तयार आहोत, आम्ही आझादीची लढाई लढण्यास तयार आहेत. अशा प्रकारे कारवाया करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाही. येणाऱ्या काळात देशाच्या जनतेला उत्तर द्यावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणेचे पुरावे काय असतात, ३ हजार पैकी हाताच्या बोटावर शिक्षा झालेली आहे, खोटे आकडे दाखवेल जातात, खोटे पुरावे सादर केले जातात. शिवराय, डॉ. आंबडेकर यांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याची संधी भाजप सोडत नाही. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणे आम्ही ईडी आणि पंतप्रधान यांना पाठवली आहेत, तरी बंदुका आमच्याकडे दाखवत आहेत, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community