मुंबईतील हवेमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर हवेचे शुध्दीकरण करण्यासाठी मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनचे प्रात्यक्षिक सध्या महापालिका मुख्यालयाच्या परिसरात केले जात आहे. यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये हवेतील प्रदुषित घटक किती होते आणि ते कमी करण्यात किती यश आले या परीक्षेचा निकाल आता बाकी आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून लावलेल्या यंत्रांमुळे खरोखरच हवेचे शुध्दीकरण झाले का याबाबत सर्वांचीच आता उत्सुकता ताणली गेली आहे.
( हेही वाचा : पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातील पहिली फॉरेस्ट ‘कॅनोपी’ ट्रेन! )
हवा शुध्दीकरण यंत्र
मुंबई महापालिका मुख्यालयातील प्रवेश क्रमांक २ च्या समोरील मोकळ्या जागेत मागील ५ मार्च रोजी आय वायर या कंपनीच्यावतीने प्रात्यक्षिकाकरता हवा शुध्दीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. परंतु या यंत्रातून हवेतील प्रदुषित घटक नष्ट करून शुध्द हवा बाहेर फेकून हवेतील प्रदुषण कमी केले जात असले तरी प्रत्यक्षात याच्या आवाजामुळे ध्वनीप्रदुषणाचा त्रास आसपास जाणू लागला आहे. तर दुसरी एक मशीन्स प्रवेशक्रमांक ३च्या बाहेर लावली आहे. जी मशीन कमी क्षमतेची असून यामधून तेवढासा आवाज येत नाही. परंतु हवा शुध्दीकरणाच्या या दोन्ही मशिन्स सध्या कुतुहलाचा विषय ठरला आहे.
…तर प्रशासन पुढील कार्यवाही करेल
महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हवेतील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आठ ते बारा प्रदूषित तत्वे कमी करण्यास या मशीन प्रयत्न करत आहे. या तंत्रज्ञ निरीने मान्यताप्राप्त प्रदूषित तत्वे शोधून घेत शुध्द हवा बाहेर सोडली जाते. या मशीन बसवण्यापूर्वी संबंधित कंपनीने पंधरा दिवस आधी हवेतील घटकांचे मोजमाप केले होते. परंतु आता मागील पंधरा दिवसांतील हवेतील घटकांची नोंद घेतली गेली आहे, त्यानुसार हवेतील घटक कमी होऊन किती प्रमाणात हवा शुध्द झाली किंवा कसे, याचा अहवाल आता प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जर यामध्ये हवा शुध्दीकरणाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसल्यास प्रशासन पुढील कार्यवाही करेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community