तर आयुक्तांच्या निर्णयाविरोधात व्यावसायिक घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव?

124

संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळल्यानंतर, उलट्या दिशेने वाहन चालवणा-यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. आता यापुढे जात आयुक्तांनी रविवारीही बांधकाम बंद केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. आधीच 10 नंतर काम बंद ठेवण्याच्या नियमाबाबत बांधकाम व्यवसायिकांमध्ये नाराजी होती. आता रविवारीही बांधकाम बंद केले, तर या निर्णयाविरोधात  बांधकाम व्यवसायिक मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यची शक्यता आहे.

रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर नाॅईस अंडर कंट्रोल मोहीम आखण्यात आली असून त्यात रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. आता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे ध्येय आहे. रविवारी बांधकाम बंद ठेवण्याचा विचार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे.

( हेही वाचा: भाजप नेत्याला मुंबई महापालिकेकडून २४ तासांत १४ नोटीस! )

रिमूव्ह खटारा मोहीम’

शहर आणि उपनगरांत अनेक रस्त्यांच्या कडेला व पुलाच्या खाली भंगार अवस्थेत वाहने पडून असतात. त्यासंदर्भातही अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत, मुंबई पोलीस आणि पालिकेसह ‘रिमूव्ह खटारा मोहीम’ राबवण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.