ईडीच्या कारवायांनी राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असून अनेक अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईचा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचे बोलावणे आले तर मी आत्महत्या करेन असे व्यक्तव्य आव्हाड यांनी केले आहे.
काय म्हणाले आव्हाड?
ईडीने मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर केलेल्या कारवाईनंतर आव्हाडांनी असं वक्तव्य केले आहे. तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर वरिष्ट पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र माझं मत विचाराल तर माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावण आलं तर मी आत्महत्या करेन असं व्यक्तव्य आव्हाड यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाड एवढेच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी यावेळी भाजपावर निशाणाही देखील साधला आहे. राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
….तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ
केंद्राकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येतोच, मात्र यापद्धतीने सरकार अस्थिर करावे हे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community