‘या’ जिल्ह्यात लावण्यात आली जमावबंदी, कारण ठरतोय ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट!

119

द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. आता राजस्थानच्या कोटा शहरामध्ये मंगळवारी जमावबंदी लागू करण्याला कारणीभूत ठरला आहे तो द कश्मीर फाईल्स हा चित्रपट. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाप्रशासनाने 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान जमावबंदीची घोषणा केली आहे.

…म्हणून जमावबंदी 

गर्दी करणे, घोषणा देणे, आंदोलन करणं, मोर्चे काढण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. मुख्यपणे कोटा शहरामध्ये चित्रपटगृहांची संख्या अधिक असल्याने, तिथे या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिलं आहे. चित्रपट पाहण्यावर बंधी घालण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सभागृहात गदारोळ

राज्यसभेत शुन्य प्रहरामध्ये भाजप आमदार संदीप शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला की, जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम नाही का? हा कसला आदेश आहे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याला इतर भाजप आमदारांनी समर्थन करत, सभागृहामध्ये गदारोळ केला.

( हेही वाचा :संजय राऊतांनी टार्गेट केलेल्या नवलानी यांना मुंबई गुन्हे शाखेचं समन्स )

विवेक अग्नीहोत्री यांचं ट्वीट

यासंदर्भात द कश्मीर फाईल्स चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी भीती निर्माण करतात आणि त्यात सक्षम होतात आणि आपण त्यांना घाबरतो, असं वक्तव्य अग्निहोत्री यांनी केलं आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.