शिवसेनेचा स्वबळाचा नारा; आघाडीत बिघाडी?

143

सध्या राज्यात दिवसेंदिवस मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांमुळे महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तसे संकेत शिवसंपर्क अभियानाच्या वेळी दिले.

lokhande

शिवसेनेच्या खासदारांचा राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरु

याआधी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेला कदाचित स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सध्या शिवसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या खासदारांनी राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्याप्रमाणे खासदार राज्यभर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद येथे बोलताना शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी बोलताना  महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आणि अन्य निवडणुकांच्या जागा शिवसेना लढवणार आहे, त्यासाठीच जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न म्हणून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे, असे म्हटले.

(हेही वाचा गोध्रा हत्याकांडाची पुनरावृत्ती! प. बंगालमध्ये कुलूपं लावून घरंच पेटवली, १० जणांचा मृत्यू)

राज्यात भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आघाडी सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे व विरोधक सत्ता गेल्याने देत असलेला त्रास हा जनतेपर्यंत पोहचवणे, तसेच राज्यात भगवा फडकवण्यासाठी शिवसंपर्क अभियान चालवण्यात येत आहे, असे खासदार लोखंडे म्हणाले. शिवसेना भाजपाच्या सर्व जागा काबीज करणार का, यावरील उत्तर देताना ‘आम्ही महाराष्ट्रात सर्व जागा शिवसेना म्हणून  लढवणार असल्याचे शिर्डीचे शिवसेना खासदार तथा संपर्क अभियान प्रमुख सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. एक प्रकारे शिवसेना महाविकास आघाडीतील काँग्रेस – राष्ट्रवादीलाच शह देण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मेव्हने श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कार्यवाही विषयी बोलण्यास नकार दिला, तर निलेश राणे यांचा बाप मुख्यमंत्री असताना नामांतर का केले नाही, असे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.