चंद्रकांत पाटलांनी दिला सेनेला सल्ला

112

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस – भाजपामध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेला डिवचण्यास सुरुवात केली आहे.

तर काँग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल

कोल्हापूरची जागा सात पैकी पाच वेळा शिवसेना आणि दोन वेळा काँग्रेस जिंकली. त्यातून ही जागा त्यांनी काँग्रेसला दिल्याने शिवसैनिक हतबल, नाराज, अस्वस्थ आहेत. रोज सकाळी उठून नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढावे लागत असल्याने, अजानची स्पर्धा घ्यावी लागते यामुळे अस्वस्थ आहे. या निवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवे ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे सावध राहा. उद्या संजय राऊत आम्ही आमच्या घरचे पाहून घेऊ म्हणतील. तुमच्या घरी काय सुरु आहे हे रोज टीव्ही सुरु केल्यावर दिसत आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाराज शिवसैनिक संपर्कात आहेत का असे विचारले असता त्यांनी हे सांगण्याइतका कच्चा राजकारणी मी नाही, असेही पाटील म्हणाले.

(हेही वाचा #The Kashmir Files : चित्रपटाचा प्रभाव पडला खासदारावर, थेट काँग्रेसचा केला त्याग)

जयश्री जाधवांना करून दिली भाजपच्या काळाची आठवण 

या मतदारसंघात आपला उमेदवार असल्याने काँग्रेसने उमेदवारीचा दावा केला होता. मात्र या मतदारसंघात सतत शिवसेनेचा आमदार निवडून येत असल्याने येथून सेनेलाच उमेदवारी मिळावी, असा सेनेचा दावा होता. अखेर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत झाली, त्यावेळी जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला. जयश्री जाधव मी तुमच्या घरी दोनवेळा आलो होतो, त्यावेळी हात जोडून ‘तुम्हाला अडचणीत असतील तर त्यावर मात करु’, यासाठी विनंती केली. तुम्ही कालपर्यंत भाजपच्या नगरसेविका होत्या. तुमचा दीर नगरसेवक होता. चंद्रकांत जाधव हे भाजपाचे, संघाचे अतिशय चांगले कार्यकर्ते होते. अपघाताने तुमचे पती हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले. पुन्हा एकदा परत येण्याची ही एक संधी होती. त्यामुळे त्यांनी मन मोठे करत दूरचे पहायला हवे होते, शेवटी या देशाला भवितव्य मोदी आहे. तुम्ही ज्या पक्षाला धरुन बसला आहात त्या पक्षाचे नेते कुठे आहेत शोधायला लागते, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.