आता आयकर विभागाची कारवाई, टार्गेट उद्योगपती!

136

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या ११ फ्लॅट्सवर ईडीने जप्ती आणली. तेव्हापासून ईडीची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. याआधी महाविकास आघाडीतील नेते मंडळी ईडीच्या टार्गेटवर होते, आता यात आयकर विभाग सक्रिय झाला आहे. आयकर विभागाने उद्योगपती टार्गेट केले आहेत. मुंबईतील ३ मोठ्या उद्योगपतीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

हिरानंदानी ग्रुप्सवर धाड 

आयकर विभागाने बिल्डर लॉबीवर धाडी मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्पोरेट क्षेत्रासह बड्या शहरांतील बांधकाम व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. प्राप्तीकर विभागाने मंगळवारी, २३ मार्च रोजी सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश आहे.

(हेही वाचा शिवसेनेचा स्वबळाचा नारा; आघाडीत बिघाडी?)

२४ ठिकाण्यांवर छापे 

आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. रियल इस्टेटमधील ओमॅक्स ग्रुपवर धाड रियल इस्टेट क्षेत्रातील नामवंत ओमॅक्स ग्रुपने ग्राहकांशी 3000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार रोखीने केला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार बेहिशोबी असल्याचे सांगत प्राप्तीकर विभागाने पुरावेही गोळा केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.