कोमो इंटरप्राइझेस प्रा. लि. या कंपनीत आदित्य ठाकरे मार्च २००५ पर्यंत संचालक होते, त्या कंपनीचे संचालक नंतर नंदकिशोर झाले. नंदकिशोर याची ठाकरेंशी काय लिंक आहे? जो माणूस हवाला करतो, पैशाचा गैरव्यवहार करतो, तो महाराष्ट्राचा एक मंत्री यांच्यासोबत जर नंदकिशोर याचे थेट संबंध असतील, तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर दिले पाहिजे. त्यांचा मनसुख हिरेन केला नाही ना, याची भीती आहे. म्हणून ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे. कारण अशाच प्रमाणे मनसुख हिरेनची अचानक बातमी आली होती, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
नंदकिशोर चतुर्वेदी कुणाचे पार्टनर?
नंदकिशोर चतुर्वेदी हा कुणाचा फ्रंट मॅन आहे. कुणाचा खास माणूस आहे? कुणाच्या कंपन्या त्यांच्याबरोबर रजिस्टर आहेत? कुणाचा या पार्टनर आहे? या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. कालच्या कारवाईनंतर ईडीचे स्टेटमेंट पाहिले तर चतुर्वेदी यांच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यात आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत नंदकिशोर चतुर्वेदी यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत दूध का दूध, पानी का पानी होईल. चंद्रकांत पटेल हा कोणत्या माजी नेत्याचा पार्टनर आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. हे लोक महाराष्ट्र विकायला गेले होते, त्यांना आता मराठी माणसे दिसत नाही. हातात यांना चतुर्वेदी, पटेल दिसत आहेत. मराठी माणसांच्या नावाने उद्योग सुरु केले आणि खिसे भरण्याची वेळ येते तेव्हा त्यांना अमराठी आठवत आहेत, असेही आमदार राणे म्हणाले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त)
नंदकिशोर चतुर्वेदी यांचा काय आहे संबंध?
२०१६मधील नोटबंदीनंतर ५ वर्षांनी मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे अडचणीत सापडले. खोट्या कंपन्यात गुंतवलेला पैसा पाटणकरांच्या कंपनीत आल्याचा ईडीला संशय आहे. पुष्पक ग्रुप आणि श्रीधर पाटणकर यांच्यातील व्यवहार तपासणार आहे. नोटबंदीच्या काळात झालेले व्यवहार आणि राजकीय कनेक्शन चर्चेत येणार आहे. पुष्पक ग्रुपच्या खात्यात जुन्या नोटांच्या माध्यमातून ८४ कोटी जमा झाले होते. त्यातील २१ कोटी हे पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या खात्यात जमा झाले. २०१९-२० मध्ये पुष्पक ग्रुपने एका रिअल इस्टेटमध्ये एका नव्या कंपनीची स्थापना केली. पुष्पकने दिलेले २१ कोटी पुन्हा नव्या कंपनींना देऊन ते पुष्पक ग्रुपमध्ये फिरवण्यात आले. यानंतर नंदकिशोर चतुर्वेदी आणि पुष्पक ग्रुपने आणखी ९ कोटी रुपये पुष्पक रिऍलिटीमध्ये जमा केले. पुष्पक रिऍलिटीने हेच ३० कोटी रुपये श्रीधर पाटणकर त्यांच्या कंपनीला कर्ज दिले. पाटणकरांनी या बदल्यात ११ फ्लॅट्स लिहून दिले. हेच फ्लॅट्स ईडीने जप्त केले.
Join Our WhatsApp Community