पुणेकरांच्या आरामदायी प्रवासासाठी केंद्राचे ८० कोटी!

139

पुणे महापालिकेला केंद्र शासनाकडून इलेक्ट्रिक बससाठी ८० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सात मीटरच्या २०० मिडी इलेक्ट्रिक बस भाड्याने घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यास महापालिका प्रशासकांनी मंजुरी दिली.

( हेही वाचा : कोरोना काळात लूट झाली, चिंता नको; पैसे मिळणार परत! )

इलेक्ट्रिक बसचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न

शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांची संख्या कमी व्हावी. त्याऐवजी सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडूनही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारने मोठ्या शहरासाठी हवा गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक बसचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देऊन बस भाड्याने तसेच खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या सुमारे २७५ इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. तर ३५० बसेस या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील डिझेलवरील बसचे प्रमाण टप्प्याटप्‍प्याने कमी केले जाणार आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक बस खरेदी व भाड्याने घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.