हातावर पोट, रहायला हक्काचे घर नाही, सरकारी घर (घरकुल) मंजूर झाले, पण ते बांधण्यासाठी जागाही नाही. पुणे जिल्ह्यात जागेला सोन्याचा भाव आलेला. त्यामुळे जागा खरेदी करण्याची ऐपत नाही. अशा परिस्थितीत सरकारी घरासाठी जागा कशी मिळवायची, या विवंचनेत असलेल्या दोन हजार ५ बेघरांना पुणे जिल्हा परिषदेने घरकुलासाठी त्यांना मोफत जागा मिळवून दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आता उशिरा का होईना, या बेघरांना आता त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय
पुणे जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे भल्या-भल्यांनासुद्धा घरासाठी अर्धा-एक गुंठा खरेदी करणे अशक्य होऊन बसले आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने, हातावर पोट असलेल्या गरिबांनी सरकारी घरकुलासाठी जागा खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मार्ग काढण्यासाठी घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेने दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, गिरीश बापट आणि केंद्र सरकारकडे सातत्याने केली होती.
(हेही वाचा नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन केला नाही ना? नितेश राणे)
Join Our WhatsApp Community