विमानतळावर जप्त केले ३ हजार हिरे!

152

पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख 66 हजार 415 इतकी आहे.

( हेही वाचा : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत अखेर ठरलं! )

75 कॅरेट वजनाचे 3 हजार हिरे

शारजाहून आलेल्या व्यक्तीने हे हिरे आणले होते. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती त्यांनी हा सापळा रचला होता. पुणे विमानतळावर त्यानुसार सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती. हे हिरे 75 कॅरेट वजनाचे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपासणी केल्यावर हे हिरे आढळून आले.

( हेही वाचा : पुणेकरांच्या आरामदायी प्रवासासाठी केंद्राचे ८० कोटी! )

हिऱ्यांची तस्करी होणार याबाबतची माहिती एअर इंटेलिजन्स युनिटला 17 मार्च रोजी मिळाली होती. म्हणूनच पुणे विमानतळावर सर्वांची चौकशी व तपासणी सुरू होती. या संबंधित इसमाला एअर इंटेलिजन्स युनिटने अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.