भारताची ताकद वाढली! ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

140

सध्या जगभरात रशिया-युक्रेन युद्धाची चर्चा सुरू आहे. प्रत्येक देश आपली युद्धाची किती क्षमता आहे, याची तपासणी करत आहे. अशा वेळी भारतासारख्या शक्तीशाली देशाकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशा परिस्थितीत भारताने स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे.

क्षेपणास्त्राने अचूक मारा केला

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. या चाचणीत क्षेपणास्त्राने अचूक मारा केला. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले.

(हेही वाचा निवृत्त होणा-या सदस्यांना अजित पवारांकडून हास्यविनोदात निरोप)

सुखोई-30MK-1द्वारेही झालेली चाचणी

८ डिसेंबर २०२१ रोजीही ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या एअर व्हर्जनची चाचणी करण्यात आली होती. हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-30MK-1मध्ये ही चाचणी यशस्वी करण्यात आली होती. सुखोई-३० एमके-१ फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी स्तरावर विकसित करण्यात आले आहे. दुसरीकडे भारतीय हवाई दलासाठी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचे अपग्रेडेड एअर लॉन्च व्हर्जन तयार केले जात आहे. त्याची रेंज 800 किमी असेल. म्हणजेच आपली लढाऊ विमाने हवेत असताना एवढ्या दूरवरून शत्रूचे स्थान नष्ट करू शकतील. भारत आता नव्या रणनीतीनुसार क्षेपणास्त्रांची रेंज सातत्याने वाढवत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.