काश्मीरमध्ये 890 केंद्रीय कायदे लागू, 270 राज्य कायदे हटवले! काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

135

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तेथे आतापर्यंत 890 केंद्रीय कायदे लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले होते. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथे 890 केंद्रीय कायदे लागू करण्यात आले. 70 वर्षांहून अधिक काळ जम्मू-काश्मीरच्या लोकांना जो हक्क नाकारण्यात आला तो आता दिला जाणार असल्याचंही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.

काश्मीरची विकासाकडे वाटचाल

राज्यसभेत जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चार तास चर्चा झाल्यानंतर, सीतारामन यांनी विविध मुद्द्यांवर उत्तर दिली. भारताच्या विविध भागात लागू होणारे कायदे काश्मीरला मिळालेल्या विशेषाधिकारामुळे लागू होत नव्हते. त्यामुळे तिकडे नोकरी मिळत नव्हती. आता तिथे नोकरीही करता येणार आहे. जमीनीही खरेदी करता येतील. तसेच, आता औद्योगिक विकासामधील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर राज्यात भेदभाव करणारे जे 250 कायदे होते ते रद्द करण्यात आल्याचेही सीतारामन यांनी यावेळी सांगितले.

( हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत कोण? )

राज्यातील दहशतवाही घटना

2021 जम्मू काश्मीर येथे दहशतवादी संघटनांच्या 44 म्होरक्यांसह 180 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यापैकी 149 स्थानिक, तर 32 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. राज्यात दहशतवादी घटनाही कमी झाल्याचं, सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. तसेच, पोलीस सुरक्षा दलातील जवानांचे हुतात्मा होण्याचे प्रमाणही 33 टक्क्यांनी घटल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.