नुकताच ‘आयक्यू एअर’ या संस्थेने जगातील सर्वांत प्रदूषीत शहरांचा हवा गुणवत्ता अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबई जगातील सर्वात प्रदूषीत शहरांमध्ये 124 व्या स्थानावर आहे. जगातील 6 हजार 475 शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला होता. यात मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत 124 व्या क्रमांकावर आहे. तसेच, 2021 या वर्षांत केवळ मुंबईत प्रदूषणामुळे 9 हजार 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मोकळ्या हवेत श्वास घेणही कठीण झालं आहे.
हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढले
माहितीनुसार, मुंबईत गेल्या वर्षी हिवाळ्यात पीएम 2.5 ( प्रदूषक कणांचे प्रमाण) वाढले आहे. त्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. या चार महिन्यांत पीएम 2.5 ची श्रेणी 63.5 ते 98.5 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे.
( हेही वाचा: पाच जिवंत लोकांना केले मृत घोषित! )
नवी दिल्ली सर्वात प्रदूषीत
‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 5 मायक्रोग्रॅम घनमीटर हे ‘पीएम 2.5’चे आदर्श प्रमाण आहे. महाराष्ट्रातील शहरांतील प्रदूषण यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. वायुप्रदूषणाचा परिणाम म्हणून 2021 या वर्षांत मुंबईतील 9 हजार 100 नागरिकांचा मृत्यू झाला असून, वायुप्रदूषणाच्या परिणामांवर 1अब्ज 30 कोटी अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे. जगभरातील देशांच्या राजधान्यांचा विचार करता, नवी दिल्ली ही पहिल्या क्रमांकाची प्रदूषित राजधानी आहे. येथे ‘पीएम 2.5 ’चे प्रमाण 85 मायक्रोग्रॅम घनमीटर आहे.
Join Our WhatsApp Community