संगणक शास्त्रज्ञ, जीआयएफचे निर्माता स्टीफन विल्हाइट यांचे निधन!

150

संगणक शास्त्रज्ञ आणि जीआयएफ (GIF) चे निर्माता स्टीफन विल्हाइट यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. १ मार्च रोजी स्टीव्ह विल्हाइट यांना कोविड १९ ची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अंतिम श्वास घेताना त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत होते, अशी माहिती विल्हाइटची पत्नी कॅथलीन यांनी दिली.

त्यांचे योगदान स्मरणीय

विल्हाइट हे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅटच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होते, एक ॲनिमेटेड इमेज फॉरमॅट जो आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दैनंदिन जीवनात वापरला जातो. १९८० च्या दशकात काम करताना त्यांनी हे स्वरूप तयार केले होते.

( हेही वाचा: यंदाच्या IPL सामन्यांवर अतिरेकी हल्ल्याचं सावट! )

GIF बनलं संवादाचं मुख्य आधार

पत्नी कॅथलीनच्या म्हणण्यानुसार, विल्हाइट एक अतिशय नम्र, दयाळू आणि चांगला माणूस म्हणून परिचित होते. २०१३ मध्ये, ऑनलाइन संस्कृतीतील योगदानाबद्दल विल्हाइटला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात एक GIF चा वापर केला, तेव्हापासून GIF हे इंटरनेटवरील संवादाचा मुख्य आधार आहेत. विविध वेबसाइटच्या वापरकर्त्यांनी २०१० च्या दशकात त्यांच्या प्रतिक्रिया, शब्दचित्रे आणि मीम्स तयार करण्यासाठी GIF चा वापर केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.