शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी गुरूवारी विधान परिषदेत मुंबै बँकेच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मनिषा कायंदे यांच्या मागणीवर भाजप नेते आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी प्रवीण दरेकर आणि मनिषा कायंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.
काय म्हणाले प्रविण दरेकर?
मनिषा कायंदे यांच्या या मागणीवर विधान परिषदेत प्रत्युत्तर देताना प्रविण दरेकर म्हणाले, ‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ, असे म्हणत मनिषा कायंदे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. पुढे दरेकर असेही म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे.’ दरम्यान, यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भडकल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – एसटी संपकऱ्यांचा संतप्त सवाल, … तर मग वेळ का मागितला?)
काय होती मनिषा कायदेंची मागणी?
मुंबै बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने अहवाल दिला आहे. या अहवालात म्हटले आहे, मुंबै बँकेला बरखास्त करा आणि प्रशासक नेमा. यावरुन मुंबै बँकेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, अशी मागणी मनिषा कायदेंनी सभागृहात केली. तर मनिषा कायंदे यांनी मुंबै बँकेचा मुद्दा काढताच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भडकल्याचे दिसून आले आणि त्यांनी कायदेंना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community