इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या यंदाच्या हंगामाची सुरूवात 26 मार्चपासून होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा आयपीएलचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात एक मोठा बदल होणार असून 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या मोसमातील पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू खेडाळू रवींद्र जडेजा आता चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. चेन्नईचे कर्णधारपद भूषवणारा जडेजा हा धोनी आणि रैनानंतरचा तिसरा खेळाडू आहे.
( हेही वाचा : आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )
कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय
महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे आणि नवा कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे. असे ट्वीट करत चेन्नई सुपर किंग्जने यासंदर्भात माहिती दिली. 2008 पासून महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईचा कर्णधार आहे.
📑 Official Statement 📑#WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
धोनी हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने अनुक्रमे 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये चार आयपीएल विजेतेपदांवर चेन्नईचे नाव कोरले आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 121 सामने जिंकले असून 82 सामने गमावले आहेत.
Join Our WhatsApp Community