मराठी हृदयसम्राट जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि नगरसेवक संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मार्चला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वरळी-प्रभादेवी-दादर या विभागांमधून शिवतीर्थापर्यंत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात बाईक रॅली काढण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
( हेही वाचा : राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये आता ‘माय मराठी’चा बोलबाला! )
मनसेकडून बाईक रॅलीचे आयोजन!#MNS #MNSParty #Shivjayanti #Maharashtra #ChattrapatiShivajiMaharaj #Dadar pic.twitter.com/3NFr46uM5e
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 24, 2022
शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मनसेकडून तिथीनुसार साजरी केली जाणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला राज्यातील सर्व मनसे सैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सोमवारी असंख्य मनसे सैनिक दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोठ्या उत्साहाने जमले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
Join Our WhatsApp Community