आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने, शाळा सुरळीत सुरु झाल्या आहेत. पण, मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, तसेच प्रत्यक्षात शिकवणीने मुलांना अधिक समजतं, म्हणून यंदा उन्हाळी सुट्ट्या एप्रिलपासून न देता हा संपूर्ण महिना विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे. तसेच, अभ्यासक्रम लवकर संपावा म्हणून रविवारीही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाऊ शकते. असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात नाराजीचा सूर आहे.
पुन्हा उजळणीसाठी शाळा
उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्यावरून पालक आणि शाळा प्रशासनामध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वर्षी करोनामुळे शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घेण्यासाठी शाळांनी एप्रिल आणि मे महिन्यांत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये पालक आपल्या मुलांना घेऊन सहलीसाठी किंवा नातेवाइकांकडे जातात.
( हेही वाचा: इलेक्ट्रिक गाडी खरेदी करताना घ्या ही काळजी! )
लवकरच निर्णय येण्याची शक्यता
यंदा सुट्ट्यांमध्ये शाळा सुरू राहणार असल्याने, पालकांकडून त्याला विरोध होत आहे. शाळा उन्हाळ्याऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करा, अशी मागणीही पालक करीत आहेत. पालक आणि शाळा प्रशासनामध्ये उन्हाळी सुट्ट्यांवरुन जो वाद सुरु झाला आहे. तो आता शिक्षण विभागाकडे गेला असून, येत्या 3 ते 4 दिवसात यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community