अभिमानास्पद! जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधीक महिला वैमानिक

130

देशातील एकूण वैमानिकांपैकी 15 टक्के महिला वैमानिक असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी संसदेत दिली. जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. इतर देशांमध्ये केवळ 5 टक्केच महिला वैमानिक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महिला सशक्तीकरणाच्या आणखी एका क्षेत्रात भारताने जगाला मागे टाकल्याचे ते म्हणाले.

भारतात सर्वाधिक महिला वैमानिक

ज्योतिरादित्य सिंधीया यांनी लोकसभेत सांगितले की, गेल्या 20-25 वर्षांत विमान वाहतूक उद्योगात बरेच बदल झाले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. इतर सर्व देशांमध्ये केवळ 5 टक्केच महिला वैमानिक आहेत. परंतु, भारतात हे प्रमाण 15 टक्के आहे.

( हेही वाचा: रेल्वे स्थानकावरच प्रवाशांचा होतोय थकवा दूर, जाणून घ्या मध्य रेल्वेची अनोखी सुविधा! )

फ्लाईट ट्रेनिंग स्कूल उभारणार

कोरोनाच्या संकटादरम्यान, भारताने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रगती केली आहे. नाशवंत खाद्यपदार्थांसाठी मालवाहू उड्डाणे येत्या काही वर्षांत 30 टक्क्यांपर्यंत वाढवून 133 नवीन उड्डाणे केली जातील, असे सिंधीया यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत पायलट परवाना नवीन तंत्रज्ञानाने सुलभ केला जाईल. अधिक नोक-या निर्माण करण्यासाठी आणि ड्रोन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वैमानिकांसाठी 33 नवीन देशांतर्गत कार्गो टर्मिनल आणि 15 नवीन फ्लाइट ट्रेनिंग स्कूल तयार करण्याची सरकारची योजना असल्याचे सिंधीया यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.