विधानसभा सभागृह कामकाजाचा आज १५वा दिवस आहे. आजच्या कामकाजाला सुरुवात झाली असून लक्षवेधीवर चर्चा सुरू आहेत. मात्र एका आमदाराला विधिमंडळात अक्षरक्ष: रडू आल्याचे पाहायला मिळाले आहे. आपण बऱ्याचदा लोकप्रतिनिधी भावूक झाल्याचे पाहतो, तर अनेकदा जाहीर मंचावरुन काही नेतेमंडळी रडल्याचे देखील आपण पाहिले आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. याचे कारणही तसेच होते.
आमदार रडण्याचे हे आहे कारण
विधिमंडळात गुरूवारपासून लक्षवेधी लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्याने ते नाराज झाले असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ राजकीय नेत्यांची नावे)
आमदार सुनील शेळकेंने दिला इशारा
जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा यांनी विषय घेतला नाही. तर २०११ साली जे प्रकरण झाले होते. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झाले होते ते याच विषयासाठी झाले असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.
Join Our WhatsApp Community