आता नितेश राणेंचा पेनड्राईव्ह! कोणता केला गौप्यस्फोट?

143

सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एक मागोमाग एक पेनड्राईव्ह दाखवून मोठमोठे गौप्यस्फोट करत आहेत. असे असताना भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनीही शुक्रवारी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवला, त्यामध्ये दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूचा तपशील आहे, असा दावा त्यांनी केला.

पेनड्राईव्ह सीबीआयला देणार

सध्या दिशा सालियन प्रकरणी आरोप केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ पाहायला मिळाली. मात्र आता नितेश राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या संसदीय संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत दिशा सालियन प्रकरणावर पेन ड्राईव्ह सादर केला. दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे. आपण लवकरच न्यायालयाच्या माध्यमातून सीबीआयकडे पेनड्राईव्ह देणार असल्याचे नितेश राणेंनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर आपल्या साहेबांनी 2 पेन ड्राईव्ह काढले, मग शिष्याने एक तरी पेन ड्राईव्ह काढला पाहिजे. म्हणून मी मुद्दामहून एक पेन ड्राईव्ह तयार करुन आणला आहे. या राज्याचा एक मंत्री त्या दिशा सालियान हत्येमध्ये, दिशा सालियानच्या बलात्कारामध्ये कसा त्याचा सहभाग आहे. त्यामध्ये एक प्रत्यक्ष साक्षीदार मला आणि माझे सहकारी अमित साटम यांना माहित देत आहे, त्यांचा तपशील या पेनड्राईव्हमध्ये आहे. ही स्क्रीप्टही मी तयार केली आहे. पण मी हा तुमच्याकडे किंवा गृहमंत्र्यांकडे देणार नाही. मी हे न्यायालयाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार, असे आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सांगितले.

(हेही वाचा आश्रमशाळा, वसतिगृहामधील लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.