…तरच चर्चा करू – अजित डोवाल

131

चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर दीड तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हटवले जाणार नाही तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार नाही असे अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

( हेही वाचा : लेफ्ट. जनरल खंदारे संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार )

परस्पर सुरक्षिततेच्या भावनेला धक्का पोहोचणार नाही

चिनी सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची गरज असून यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध योग्य मार्गावर येतील असे डोवाल यांनी सांगितले. चर्चेदरम्यान भारताने, सीमेवर शांतता आणि तणावमुक्त परिस्थिती प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक, लष्करी पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला. कोणत्याही कृतीमुळे परस्पर सुरक्षिततेच्या भावनेला धक्का पोहोचणार नाही. याची काळजी घेण्यास डोवाल यांनी सांगितले आहे.

तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. यावर डोवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ असे सांगितले. शांतताच परपस्पर विश्वास निर्माण करेल असेही डोवाल यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.