जगातील सर्वात कंटाळवाणी व्यक्ती माहितीय का? काय सांगते संशोधन!

165

कंटाळा हा शब्द सहज दिवसभरात अनेकदा आपण वापरत असतो. पण, कोणी जगातील सर्वात कंटाळवाणी व्यक्ती कोण यावर संशोधनही करेल असं मात्र आपण कधी विचार केला नसेल, पण हे खरे आहे जगातील सर्वात कंटाळवाणी व्यक्ती कोण आहे यावरही संशोधन करण्यात आले आहे. आपल्या प्रत्येकालाच कधी ना कधी आपल्या कामाचा कंटाळा येतो. पण आपल्या कामाचा सर्वाधिक कंटाळा कोणाला आहे हे मात्र ठरवता येत नाही. पण हे आगळंवेगळं संशोधनही करण्यात आले आहे.

या संस्थेने केले संशोधन

युनिव्हर्सिटी ऑफ इस्सेक्सच्या मानसशास्त्र विभागानं हे आगळं-वेगळं संशोधन केले आहे. या विद्यापीठातील डॉ. विजनँड व्हॅन टिलबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन झाले असून, त्यातून अशी कामे करणाऱ्या व्यक्तींकडे बघण्याचा किंवा त्यांच्याशी वागण्या-बोलण्याचा दृष्टीकोन इतरांनी बदलायला हवा, असा एक सकारात्मक संदेश देखील डॉ. टिलबर्ग द्यायला विसरले नाहीत.

याचाही घेण्यात आला आढावा

डॉ. टिलबर्ग यांनी जवळपास ५०० व्यक्तींच्या राहणीमानाचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, त्यांच्या आवडी-निवडींचा अगदी सविस्तर अभ्यास केला. या व्यक्ती करत असलेल्या कामांविषयी इतरांचे नेमके मत काय? त्यांना त्यातली कोणती कामे वा व्यक्ती कंटाळवाणी वाटतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या या वाटण्याचा अशा व्यक्तींवर काय परिणाम होतो? अशा प्रश्नांचा आढावा या संशोधनात घेतला गेला.

( हेही वाचा :ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला )

ही माणसे सर्वात कंटाळवाणी

सर्वात आधी डाटा एंट्री, त्यापाठोपाठ अकाउंटिंग, त्यानंतर इन्शुरन्स, मग स्वच्छता, बँकिंग आणि सहाव्या स्थानी क्लार्कचे काम हे कंटाळवाण्या कामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. एखादी डाटा एंट्रीचं काम करणारी, शहरात राहणारी व्यक्ती जिचा सर्वाच आवडता छंद हा टीव्ही बघणे आहे, अशी व्यक्ती कंटाळवाणी असू शकते, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.