मातोश्री’वर दाऊदचा धमकीचा फोन?

172

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत असतानाचा आता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. मातोश्रीवर दुबई वरून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे.

मातोश्रीच्या लँड लाईनवर दुबईवरून फोन

शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ फोन दुबईच्या नंबरवरून आले. हे फोन मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

मातोश्रीवरील सुरक्षा वाढवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी  कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन काँल नंतर ठाकरे कुटुंबाची पुन्हा सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

धमकी आल्यानंतर मातोश्रीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मातोश्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवासस्थानाबाहेर पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली असून अजून पोलीस कुमक बोलवण्यात येणार आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. आता हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे. जर कोणी तसा खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नाही.

शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.