निर्यातीत गुजरात नंबर वन! महाराष्ट्र कितव्या स्थानी?

147

निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’अहवालात ७७.१४ गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. गुजरातने सलग दुसऱ्यांदा आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने शुक्रवारी ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ (Export Preparedness Index)जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमन्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

( हेही वाचा : मुंबईत आमदारांना खरंच मोफत घर मिळणार? गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी दिले स्पष्टीकरण )

महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर

या अहवालात एकूण ४ प्रमुख मानके आणि ११ उपमानकांच्या आधारावर देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्यात क्षेत्रातील प्रगती मांडण्यात आली आहे. चार पैकी तीन प्रमुख मानकांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून पायाभूत सुविधा आणि निर्यात प्रोत्साहन धोरण या उपमानकात राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

दोन उपमानकात राज्याचा पहिला क्रमांक

उपमानकांमध्येही महाराष्ट्राची उत्तम कामगिरी राहिली आहे. ‘पायाभूत सुविधा’ आणि ‘निर्यात प्रोत्साहन धोारण’ या दोन उपमानकात १०० गुण मिळवत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘आर्थिक सुलभता’ आणि ‘वाहतूक उपलब्धता’यातही महाराष्ट्राने देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळविले आहे. यासोबतच व्यापार पोषक वातावरण, संस्थात्मक संरचना, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापार सहाय्य, संशोधन व विकासात्मक पायाभूत सुविधा, वृध्दी व अभिमुखता, निर्यात विविधीकरण अशा उपमानकातही महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे या अहवालात नमूद आहे. यापूर्वी ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२०’ (प्रथम आवृत्ती) मध्येही महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकाविला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.