पोलीस घरी येताच पाच जणांनी सातव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार स्वित्झर्लंडमध्ये घडला आहे. या दुर्घटनेत पाच पैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ वर्षीय मुलाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांच्या दहशतीने कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सगळेच हादरले आहे.
( हेही वाचा : या वीकेंडला घरीच बसा! )
चार जणांचा मृत्यू
एका गुन्ह्याशी संबंधित प्रकरणात पोलीस या कुटुंबाच्या घरी आले होते. स्विस पोलीस होम स्कूलिंगच्या प्रकरणात अटक वॉरंट घेऊन या कुटुंबाच्या घरी पोहोचले होते. यामुळे या कुटुंबाने घाबरून इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. यात पाच जणांचा समावेश असून यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्विस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ४० वर्षीय व्यक्ती, ४१ वर्षीय पत्नी, मेहुणी, लहान मुलीचा समावेश आहे. तर १५ वर्षीय मुलाची अवस्था गंभीर आहे.
चौकशी सुरू
पोलीस घरी आले असता या कुटुंबाने दरवाजा उघडला नाही, खूप वेळ दरवाजा न उघडल्याने पोलीस अधिकारी तेथून निघून गेले. मात्र इमारतीच्या गॅलरीतून हे लोक खाली पडले आहेत. अशी माहिती पोलिसांनी मिळाली. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
Join Our WhatsApp Community