आता विवेक अग्निहोत्री बनवणार ‘दिल्ली फाईल्स’! शाहीन बाग, सीएए, दंगल आणि बरेच काही…

131

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या ‘व्हाय’ दर्जाच्या सुरक्षेत फिरत आहेत. काश्मिरातील हिंदूंवर झालेल्या अमानुष अत्याचाराला या चित्रपटात वाचा फोडण्यात आली. त्यामुळे आधी पुरोगामी शक्तीमुळे बहिष्कृत केलेल्या या चित्रपटाला अचानक सर्वसामान्यांनी उचलून धरले आणि हा चित्रपट देशभरात हिट झाला आहे. आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘दिल्ली फाईल्स’ चित्रपटाची घोषणा केली. त्यामुळे दिल्लीतील दंगलीत हिंदूंना ठार करण्यात आले, त्यांनाही वाचा फोडण्यात येणार आहे.

केंद्राच्या सीएए कायद्याला विरोध

दिल्ली दंगल का झाली, याचे मूळ काय आहे, याचा ऊहापोहदेखील यानिमित्ताने होणार आहे. केंद्राच्या सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत मुसलमानांनी जे आंदोलन केले. त्यावेळी शाहीन बाग, जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटी येथे दीर्घकाळ आंदोलन केले. त्यानंतर दंगल घडली, त्यात हिंदूंची घरे जाळली, काहींच्या ठार केले. जर दिल्ली फाइल्स चित्रपट आला तर या सर्व घटनांचा समावेश करावा लागणार आहे. यासंबंधी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘आम्ही सध्या ‘द दिल्ली फाइल्स’ बनवत आहोत. वेब सीरिजचा संबंध आहे. आम्ही ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये पुरेसे शूट केले आहे की, आमच्याकडे जे काही हवे आहे ते आहे. आपल्याला काही चांगले लोक हवे आहेत, जे हे सर्व एकत्र बांधू शकतील. हे खूप मनोरंजक असेल परंतु कोणीतरी यासाठी वित्तपुरवठा करावा लागेल. हा आपला इतिहास आणि वारसा आहे आणि कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने तो उचलला पाहिजे, असेही अग्निहोत्री म्हणाले.

(हेही वाचा स्वत:च्या रक्ताने चाहतीने बनवले ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे पोस्टर!)

स्वतःच्या हिमतीवर आम्ही सिनेमा बनवला

बॉलिवूडमधून होणाऱ्या विरोधावर विवेक यांनी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘मी इथे कुणाला चुकीचे ठरवायला किंवा हरवायला आलेलो नाही. मी माझ्या हिमतीवर सिनेमा बनवतो. खरे तर आम्ही बॉलिवूडसाठी उपरे आहोत. आम्ही बॉलिवूडमधील प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. आम्ही स्वतंत्रपणे सिनेमाची निर्मिती करतो. त्यामुळे माझे कुणी कौतुक करते किंवा नाही याचा मला काहीच फरक पडत नाही. मी फक्त इतकेच सांगितले आहे की, काही प्रभावशाली व्यक्ती मी या सिनेमातून खोट्या बातम्या आणि विद्वेषाचा प्रपोगांडा पसरवत असल्याचा खोटा प्रचार करत आहेत, असेही अग्निहोत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.