इंडियन ऑईलच्या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयकडून बेड्या!

130

भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेडच्या 3 अधिकाऱ्यांना अटक केली. यात नागपुरातील दोन आणि गोंदियाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. यासंदर्भातील माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार, गोरेगाव येथील मिरा पेट्रोल पंप मालकाला इंडियन ऑईलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. पंपावर आवश्यक साठा उपलब्ध करून देण्यासाठी हे पैसे मागण्यात आले होते.

सीबीआयच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू 

याप्रकरणी गोलार यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी सुरू असतानाच आकाश चौधरी यांनी देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीयाने याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून सुनील गोलार आणि नागपुरातील इंडियन ऑईलचे महाव्यवस्थापक एन.पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले या दोघांना अटक केली.

(हेही वाचा – हिजाब बंदीनंतर कर्नाटक सरकारचा आणखी एक मोठा निर्णय  )

लाच घेताना सांकेतिक भाषेचा वापर

इंडियन ऑईलचे आरोपी अधिकारी लाच घेताना सांकेतिक भाषेचा (कोडवर्ड) वापर करीत होते. रोडगे हे ए-वन नावाने तर नंदले ए-टू नावाने वावरत होते. लाच घेऊन गेलेल्या व्यक्तीला रोडगेने ती रक्कम ए-टू कडे देण्यास सांगितले होते. त्यांच्यातील हा सर्व सांकेतिक व्यवहार सीबीआयने आधिच रेकॉर्ड केला होता. त्यामुळे त्यांना लाच स्विकारताना पकडताना पोलिसांना अडचण गेली नाही. गोंदियात गोलरला अटक केल्यानंतर नागपुरात नंदले आणि रोडगेला जेरबंद करण्यात आले. या तिघांच्या घरी आणि कार्यालयत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान या तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.