उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार
सीएनजी इंधन स्वस्त झाल्याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. व्हॅट कमी झाल्यामुळे सीएनजीची किंमत स्वस्त होणार असून त्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. इंधनवाढीच्या दरवाढीच्या पाश्वभूमीवर सीएनजीचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – ‘या’ अफवेमुळं पेट्रोल पंपावर गर्दी; कारण ऐकून पंप चालक हैराण)
राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे.
Join Our WhatsApp Community