माहिममध्ये बस स्टॉपच बनले डम्पिंग ग्राऊंड?

135

मुंबई महापालिकेच्यावतीने अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असली तरी मुंबईतील भररस्त्यांवर डेब्रीज टाकण्याचे प्रकार घडत आहे. माहिममधील सिटीलाईट सिनेमा जवळील बेस्ट बस स्थानकासमोरच दोन ट्रक डेब्रीज टाकले आहे. लेडी जमशेटजी मार्ग हा रहदारीचा रस्ता असून याठिकाणच्या बस स्टॉवपरच दगड विटांचा राडारोडा टाकण्यात आला आहे.

( हेही वाचा : केंद्राच्या ‘या’ योजनेतून देशातील झोपडपट्ट्यांची संख्या घटली ! )

शुल्क भरल्यानंतर राडारोड्यांची विल्हेवाट

मुंबईत इमारतीच्या बांधकामांसह अन्य कोणत्याही प्रकाराचा राडारोडा असल्यास महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून त्यानुसार शुल्क भरल्यानंतर त्या राडारोड्यांची विल्हेवाट लावली जाते. परंतु महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही मुंबईत अशाप्रकारे अनधिकृत राडारोडा टाकून ट्रक चालक पळ काढत आहेत.

अशाचप्रकारे माहिम येथील लेडी जमशेटजी मार्गावरील सिटीलाईन सिनेमाजवळील माहिमच्या दिशेच्या असलेल्या बेस्ट बसस्टॉपवरच डेब्रीज टाकण्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरा हे डेब्रीज टाकलेले आहे. सकाळी हे डेब्रीज पडलेले पहायला मिळाले आहे. आसपास कुठेही इमारतीचे बांधकाम सुरु नसून तब्बल दोन ट्रक असतील एवढे हे डेब्रीज होते. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही करण्यात आली होती, परंतु दुपारी चार वाजेपर्यंत हे डेब्रीज तिथेच पडून होते.

धडक कारवाई

मागील दोन वर्षांपूर्वी वरळीमध्ये अशाचप्रकारे डेब्रीज टाकण्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये या ट्रकचा क्रमांक शोधून त्यानुसार त्यांच्याविरोधात धडक कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे माहिममधील या अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्या ट्रक चालकासह मालकावरही कारवाई केली जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.