सोमय्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाही दिले हे आव्हान

106

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे रिसॉर्ट वाचवून दाखवायचे आहे, आम्ही ते तोडून दाखवतो अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. मात्र, याबरोबरच त्यांनी विधीमंडळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला हवे तर अटक करा, असे सांगितले. याचा संदर्भ देत किरीट सोमय्यांनी कारवाईसाठी तुमची परवानगी कशाला घ्यायची, तुमच्यावरही कारवाई होणार! चतुर्वेदीसोबत असलेले संबंधही उघड करणार असे सांगत ठाकरेंवरही कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही असाही गर्भित इशारा दिला आहे.

( हेही वाचा : माहिममध्ये बस स्टॉपच बनले डम्पिंग ग्राऊंड? )

रिसार्ट तोडल्याशिवाय राहणार नाही

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे रत्नागिरी दापोलीच्या दौऱ्यावर गेले असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस ठाण्याला भेट देत त्यांना या कारवाईची आठवण करून देण्यासाठी ते प्रतिकात्मक हातोडा घेऊन गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार निलेश राणे, नील सोमय्या यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. दापोलीमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना तसेच माध्यमांसमोर बोलतांना दापोलीतील भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. अनिल परब, सदानंद कदम, संजय कदम या सर्वांचे दिवस आता संपले असे सांगत परब यांचे रिसार्ट तोडल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.

किरीट सोमय्यांचा इशारा 

परब यांचे रिसॉर्ट तोडून आम्ही गप्प बसणार नसून यासाठी जे २५ कोटी रुपये खर्च केले ते कुठून आले, ते वसुलीचे पैसे आहे. त्यामुळे या घोटाळ्याबाजांवर कारवाई होणारच असे त्यांनी सांगिते. अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत, तरीही कारवाई होत नाही. मी इथे आल्यानंतर पोलिस आम्हाला निवेदन देत हे रिसॉर्ट तोडल्यास अनेकजण बेरोजगार होतील,असे सांगतात. पण सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याशी लढावे, पोलिसांना का पुढे करतात असे सांगत सोमय्यांनी माफियांना जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा इशारा दिला.

महाराष्ट्र माफियामुक्त करू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया पवार या नेहमी विचारत असतात की कारवाई होण्यापूर्वीच सोमय्यांना कसे कळते. पण आताच सांगतो की पुढील आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त केले आहे, आता आम्ही महाराष्ट्र माफियामुक्त करू असेही त्यांनी सांगितले. या नंतर किरीट सोमय्या, निलेश राणे, निल सोमय्या यांच्याह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे पोलिस ठाण्यात दाखल झाले, तिथे पोलिसांसोबत त्यांची बैठक पार पडली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.