ऐन उन्हाळ्यात ‘या’ भागात पाणीकपात!

116

पुणे शहरात उन्हाचा चटका वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, महापालिकेकडून ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर अघोषित पाणीकपात लादण्यात आली असून मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, मार्च अखेरीचे कारण देत पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांची बोळवण केली जात आहे. तर, प्रत्येक गुरुवारी पालिकेकडून शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाणीबंद ठेवले जात असल्यामुळे शहराच्या अनेक भागांत पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

( हेही वाचा : उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ! )

पुण्याची लोकसंख्या 40 ते 45 लाख असून शासनाकडून महापालिकेसाठी वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून 15 ते 16 टीएमसी पाणी वापरले जाते. यामुळे पुणेकर चांगलेच संतप्त झाले आहे.

रविवारी पाणीपुरवठा बंद

रविवार २७ मार्चला महावितरणकडून भामा-आसखेड धरण परिसरात तातडीची विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे धरण परिसरातील असलेल्या महापालिकेच्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने या दिवशी नगररस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी (सोमवारी) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा राहणार आहे. असेही पालिकेने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.