पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आगामी 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना 31 मार्च रोजी संपणार होती. परंतु, आज, शनिवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
( हेही वाचा : दहावी-बारावीचे निकाल उशिराने? कारण काय वाचा… )
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. त्यासाठी शासनाने 1 कोटी 70 लाखांची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती 5 किलो दराने मोफत धान्य मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उत्तरप्रदेशात नवीन राज्यमंत्रिमंडळाची शनिवारी सकाळी बैठक झाली. यात गरिबांसाठी निःशुल्क रेशन योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील 15 कोटी लोकांना आगामी तीन महिने रेशनवर मोफत धान्य मिळणार आहे.
उत्तरप्रदेश सरकारच्या पार्श्वभूमीवर निर्णय
उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी 4.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला आगामी 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Join Our WhatsApp Community