WHO या राज्यात सुरू करणार पारंपरिक औषधांचे पहिले केंद्र!

127

भारताची पारंपरिक औषधे जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO)भारत सरकारशी ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना करण्यासाठी करार केला आहे. पारंपरिक औषधांसाठी हे जागतिक ज्ञान केंद्र भारत सरकारच्या मदतीने बांधले जाईल. यासाठी भारत 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

हे जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगरमध्ये बांधले जाणार आहे. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, हे WHO चे जगातील पारंपरिक औषधांचे एकमेव जागतिक केंद्र असेल. आपल्या देशाला पारंपरिक औषधांमध्ये आपली ताकद दाखवण्याची ही संधी असेल, असेही ते म्हणाले.

स्तुत्य उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन (GCTM) च्या स्थापनेने आनंद झाला. गुजरातमधील जामनगर येथे WHO-GCTM च्या स्थापनेसाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात झालेला करार हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

पारंपरिक औषधांचा वापर

जगातील सुमारे 80% लोक पारंपारिक औषधांचा वापर करतात. आतापर्यंत, 194 पैकी 170 जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी पारंपरिक औषधांचा वापर केल्याचे नोंदवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस म्हणाले, ‘जगभरातील लाखो लोकांवर उपचार करण्यासाठी पारंपरिक औषधे वापरली जातात. भारत सरकारच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आम्ही हे मिशन यशस्वी करण्यासाठी उत्सुक आहोत. असे डॉ टेड्रोस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.