औषधही महागली! ‘या’ तारखेपासून रोजच्या वापरातील औषधांच्या किंमतीत होणार वाढ

116

सर्वसामान्य जनतेला महागाईत कोणताही दिलासा मिळताना दिसत नाहीये. आधी घरगुती गॅस, पेट्रोल- डिझेलच्या सतत वाढणा-या किमती यात आधीच सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला होता. आता त्यातच रोजच्या वापरातील 800 औषधांचे दर तब्बल 10 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे.

…म्हणून किंमती वाढल्या

औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढला आहे.  गेल्या दोन वर्षांत काही प्रमुख API च्या किंमती 15 ते 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटेमॉलच्या किंमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, सिरप आणि द्रव औषध, (ड्राप) इतर अनेक औषधे आणि वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्‍या ग्लिसरीनच्या किंमती 263 टक्के आणि पॉपीलीन ग्लायकोल 83 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मध्यंतरीच्या किंमती 11 टक्क्यांवरून 175 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत.

( हेही वाचा: WHO या राज्यात सुरू करणार पारंपरिक औषधांचे पहिले केंद्र! )

‘या’ औषधांच्या वाढणार किंमती

दरवाढ झालेल्या औषधांमध्ये ताप, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि अशक्तपणा यांसारख्या औषधांचा समावेश आहे. तसेच, पेनकिलर, पॅरासिटामोल, अॅण्टीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.