पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. आठवड्याभरात तब्बल पाचव्यांदा पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे प्रत्येकी 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती.
महत्त्वाच्या शहरांमध्ये वाढलेले दर
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.88 तर डिझेल 97.55 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.37 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 96.20 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.87 आणि 95.64 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 113.06 रुपये लिटर आणि डिझेल 95.85 रुपये लिटर इतके आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.11 per litre & Rs 90.42 per litre respectively today (increased by 50 & 55 paise respectively)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 113.88 & Rs 98.13 (increased by 53 paise & 58 paise respectively)
(File pic) pic.twitter.com/7Eg5Optru1
— ANI (@ANI) March 27, 2022
( हेही वाचा :सोमय्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाही दिले हे आव्हान )
म्हणून तेलाच्या किंमती वाढल्या
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community