शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत जाधव दांपत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. प्राप्तीकर विभागाने 25 फेब्रुवारीपासून यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांच्या निकटवर्तीयांकडे 33 ठिकाणी छापेमारी केली. यातून आता एक डायरी हाती लागली आहे. यात गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत.
‘मातोश्री’ ला दिल्या भेटवस्तू
‘मातोश्री’ याबाबत यशवंत जाधवांकडे चौकशी केली असता, मातोश्री म्हणजे आई असं म्हणत त्यांनी विषयाला कलाटणी दिली. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला, पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याचे समजते.
( हेही वाचा: भारत सोन्यातही आत्मनिर्भर! सुवर्ण उद्योगाने उचचले ‘हे’ पाऊल )
अनेक गोष्टी उलगडण्याची शक्यता
प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीत 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत 36 मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कादगपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, 50 लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे 2 कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळली आहे.
Join Our WhatsApp Community