आता करु शकता परदेश वारी! आंतरराष्ट्रीय विमानसेवा तब्बल दोन वर्षांनी सुरु

137

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे भारतवासीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. विमानसेवा सुरु होताच, लोकांचा बुकींगला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सरकारने विमान कंपन्यांवर घातलेले मर्यादित आसन क्षमतेचे निर्बंध हटवले आहेत. आता पूर्ण आसन क्षमतेने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार असल्याचे सरकारने म्हटलं आहे. विमान सेवा सुरळीत झाल्याने परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेवा पुन्हा सुरु

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांशी संबंधित विद्यमान कोरोना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानामध्ये तीन जागा रिक्त ठेवण्याचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. तसेच, क्रू मेंबर्ससाठी पीपीई किटचे निर्बंध दूर करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांकडून नियोजित पॅट डाउन तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र विमानतळ किंवा विमानात मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.

( हेही वाचा: 12 खासदारांचा बारामतीत ‘गुप्त दौरा’, शरद पवारांची घेणार भेट! )

विशेष विमानसेवा सुरु होती

कोरोनाच्या पहिल्या लाटेत खरबदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा खंडीत कारण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास दोन वर्ष विमान सेवा पूर्णपणे ठप्प होती. तर काही देशांबरोबर द्विपक्षीय करारानुसार विशेष विमान सेवा सुरु ठेवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.