विजेअभावी 110 बस डेपोतच उभ्या!

149

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाणेर येथील डेपोतील 140 ई-बसचे लोकार्पण मोठ्या थाटात करण्यात आले होते. त्यानंतर या सर्व बस दिमाखात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, 140 पैकी केवळ 30 बसच रस्त्यावर धावत असून, अजूनही 110 ई-बस विजेअभावी डेपोतच उभ्या असल्याचे समोर आले आहे.

जागतिक दर्जाचा डेपो 

केंद्र आणि राज्य सरकारच्या ई- पॉलिसी धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. जागतिक दर्जाचा ई- डेपो हा बाणेरमध्ये उभारण्यात आला आहे. तसेच प्रतिदिन प्रति बस 200 किमीप्रमाणे बस संचलनाचे नियोजन आहे. या 350 बससाठी बाणेर, वाघोली, मोशी, चऱ्होली व निगडी हे पाच डेपो विकसित केले जाणार आहेत.

( हेही वाचा :भारत बंदची हाक! कोणत्या सेवांवर होणार परिणाम? )

नवीन ई-बसच्या चार्जिंगचे काय?

या विकसीत केल्या जाणा-या  डेपोवर एकावेळी 35 बस चार्जिंग करता येणार आहेत. त्यासाठी 35 एसी/डीसी चार्जर बसवले गेले आहेत. पूर्ण चार्जिंग होण्यासाठी चार ते साडेचार तास लागतात. परंतु महावितरणाकडून पुरेशी वीज मिळाली नसल्याने, ई-बस डेपोमध्ये उभ्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या ई-बसच्या चार्जिंगचे नियोजन कसे करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.