मी तिजोरीच उघडली नाही तर… कोणाला म्हणाले अजित पवार?

151

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायमच त्यांच्या वक्तृत्वावरून चर्चेत असतात. रविवारी अर्थ खात्याचा संदर्भ घेत त्यांनी एक गुगली टाकली. माझ्याकडे तिजोरीची चावी आहे, जर तिजोरी उघडली नाही, तर काय होईल, अशा शब्दांत पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या.

बारामतीमध्ये एका कार्यक्रमात अजित पवारांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना आपल्या पदाची आठवण करुन दिल्यानंतर एकच हशा पिकला. पुरंदर तालुक्यातील एक कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे यांना मिश्कीलपणे आपल्या पदाची आठवण करुन देताना तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याचे म्हटले. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते.

(हेही वाचा धक्कादायक…२०० हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले!)

मी वाढपी, बारामतीला एक पळी जास्त वाढेन

सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्‍यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत, असे अजित पवार म्हणाले. मी निधी वाटपाच्या संदर्भात मुंबईत गेल्यावर आपल्या इथेही निधी देण्याचे काम करणार आहे. तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. वाढत्या उंचीचा असल्याने आपल्या जवळच्या लोकांच्या ताटात जरा जास्तच पडत असते हे तुम्हाला माहितीच आहे. मी जेव्हा हे वाढपी म्हणून वाढणार आहे, त्यावेळी सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करेन. पण बारामती आणि निंबूला एक पळी जास्त वाढेन एवढी नोंद घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.