दहिसर पश्चिमेच्या एन एल संकुलातील खासगी जागेतील खारफुटींच्या जंगलाला गेला महिनाभर आग लागल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात आठवडाभर आगीचे सत्र जास्त प्रमाणात सुरु असल्याने खारफुटीच्या जंगलातला धूर आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरला आहे. नजीकच्या गणपत पाटील नगरातील खारफुटींनाही आगी लावल्या जात आहेत. या आगीच्या सत्रामागे गर्दुल्ले असल्याचा दावा वनाधिका-यांनी केला. खारफुटीतील वाढत्या प्लास्टीकच्या कच-याने धुराचे प्रमाण आटोक्याबाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली.
खारफुटींमध्ये राखीव आणि खासगी जागा
एन एल संकुलात आठवडाभर ८ ते १० अग्निशमनच्या गाड्या मागवण्यात आल्या, तर गणपत पाटील नगरमध्ये तब्बल २५ अग्निशमनच्या गाड्या मागवण्यात आल्या. एल एल संकुलात रात्री अकरानंतर आग लागण्याचे सत्र सुरु आहे. ही जागा खासगी मालकीचीआहे. गणपत पाटील जागेतील खारफुटींमध्ये राखीव आणि खासगी जागा आहे. या जागेवर अतिक्रमण सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गणपत पाटील नगरातील राखीव जागेवर आग लावणारे आरोपी अद्याप वनाधिका-यांच्या हाती लागलेले नाहीत. या खासगी जागांवर सतत लागणा-या आगी रोखण्यासाठी कांदळवन विभागाकडून सोमवारी तहसीलदार कार्यालयाला पत्र लिहिले जाईल, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली.
(हेही वाचा बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा घेणार सेवेत…पण एकच अट!)
Join Our WhatsApp Community