ऑस्करच्या मंचावर हाणामारी, स्मिथने लगावली होस्टच्या कानशिलात!

98

जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणा-या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ऑस्करच्या मंचावर एक विचित्र घटना घडली आहे. या सोहळ्याचा होस्ट क्रिस रॉक याने प्रसिद्द अभिनेता विल स्मिथ याच्या पत्नीवर कमेंट केली आणि त्यामुळे भडकलेल्या स्मिथने होस्टच्या कानशिलात लगावली.

म्हणून लगावली कानशिलात

G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विल स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली. या प्रकरानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. पुन्हा माझ्या पत्नीचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नकोस, असंही स्मिथ म्हणाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

( हेही वाचा: मातोश्री आणि डायरी यावर राऊत म्हणतात… )

विल स्मिथला ऑस्कर

विल स्मिथला यावर्षी त्याच्या किंग रिचर्ड या चित्रपटासाठी ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. याच चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर, विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.